देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
कोरोनाच्यामुळे धास्तावलेल्या बेळगावकर जनतेला एक दिलासा देणारी घटना शनिवारी घडली आहे. गळ्यात पहिल्यांदा सापडलेल्या तीन कोरोनाग्रस्त रुग्णापैकी बेळगुंदीचा रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून शनिवारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली आहे.
अमरावती शहरात आज पुन्हा एक नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. आता कोरोना बाधितांची संख्या सहा झाली आहे. या सहाही लोकांना कोणाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली, या साखळीचा शोध न लागणे ही तमाम अमरावती जिल्ह्यासाठी चिंताजनक बाब असून या सहा जणांना कोरोनाची लागण करणारे कोरोनाबाधित व्यक्ती अजूनही जिल्हा प्रशासनाच्या दृष्टिपथात न येणे सगळ्यात धोकादायक आहे. अमरावतीची संभाव्य दुरवस्था थांबण्यासाठी तात्काळ भिलवाडा पॅटर्न लागू करा, अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. आजपर्यंत आढळलेले सहाही लोक मरकजला गेले नव्हते. त्यांनी विदेशात प्रवासही केला नव्हता. किंवा ते अशा संशयितांच्या संपर्कात आले असल्याची माहिती देखील समोर आलेली नाही. मग हे सहा जण कसे व कोणामुळे पॉझिटिव्ह झाले, हा यक्षप्रश्न कायम आहे.
देशांतर्गत फ्लाईट साठी 3 मेपर्यंत ची बुकिंग बंद तर आंतरराष्ट्रीय फ्लाईटसाठी 31 मे पर्यंत बुकिंग बंद, 4 मे पासूनच्या प्रवासासाठी काही ठराविक देशांतर्गत फ्लाईट बुकिंग मात्र सुरू, आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स बुकिंग 1 जून नंतरच्या प्रवासासाठी सुरू, वेळोवेळी आढावा घेऊन अंतिम निर्णय
गोंदियाच्या सालेकसा तालुक्यात लॉकडाऊनचा फायदा उचलत जगंलातुन सागावन वृक्षाची कत्तल करत लाकुड चोरुन आणणाऱ्या पाच आरोपीना वन विभाने अटक केली. दोन घटनांमध्ये आठ लाख रुपयांचा मुदेमाल जप्त करण्यात आलाय.
जालना : औरंगाबाद जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्या गाडीत 6 लाख 70 हजाराची रोकड आढळून आली. बदनापूर येथे जालन्याकडे जाताना पोलिसांनी चेक पोस्टवर तपासणी केली असता त्यांच्या गाडीत हे पैसे आढळले. दरम्यान एवढी रक्कम ते जालन्याला कुठे आणि कुणाकडे घेऊन जात होते याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे.
पुण्यात राहणाऱ्या बहरीन देशातील 125 नागरिकांना विशेष विमानाने त्यांच्या देशात पाठवण्यात आले.
नाशिक शहरात चार जणांना कोरोनाची बाधा. नाशिकच्या अंबड परिसरातील रुग्ण. कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यानं कोरोनाची लागण झाल्याचे उघड. शहरातील बधितांची संख्या 9 वर. तर जिल्ह्याची संख्या 74.
अहमदनगर : मरकजमध्ये सहभागी 24 परदेशी आणि 5 परराज्यातील नागरिकांना अटक, 24 विदेशी नागरिकांना व्हिसा गैरवापर प्रकरणी 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, विदेशी नागरिकांना मदत करणाऱ्या 5 जणांपैकी 2 जणांना देखील 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी तर 3 जणांना न्यायालयीन कोठडी, अहमदनगर सत्र न्यायालयाचा निर्णय
भिवंडी : भिवंडी ग्रामीण भागात कोरोनाचा अजून 1 रुग्ण पॉझिटिव्ह, केवणी गावातील 57 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित,
सोलापूर शहरात कोरोनाचा धोका वाढू लागल्याने आता पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या नवीन पूल आणि जुना दगडी पुलावर लोकांनी मोठे सिमेंट पाईप लावून रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे . सोलापूर , मराठवाडा या भागातून पंढरपूर मध्ये प्रवेश करावयाचा असल्यास या पुलावरूनच यावे लागते . चंद्रभागेवर एकूण तीन पूल असून सोलापूरकडून होणारी मुख्य वाहतूक जुना दगडी पूल आणि नवीन पुलावरून होत असते . आज सोलापुरात कोरोना रुग्णांची संख्या १४ झाल्याने परिसरातील नागरिकांनी एकत्र येत ३ पैकी दोन पुलावर अडथळे लावून वाहतूक बंद केली आहे . उरलेल्या एका पुलावर पोलिसांची नाकेबंदी असल्याने आता सोलापूरकडून अथवा मराठवाड्याकडून पंढरपूर मध्ये येण्याचे मार्ग बंद झाले आहेत . नागरिकांनी भीतीने हे पाऊल उचलले असले तरी यामुळे पोलीस प्रशासनावरील नाकेबंदीचा ताण कमी झाला आहे .
रायगड : पोलादपूर 62 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह, डॉ महामणकर हॉस्पिटलमध्ये सदर महिला तपासणीसाठी आली होती, मात्र नंतर त्या महिलेला मुंबई कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले. आज तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. डॉ महामणकर हॉस्पिटल सील
सोलापूर : सोलापुरात आज आणखी 1 रुग्ण कोरोनाबाधित, रुग्ण पाच्छा पेठ भागातील रहिवासी असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती , सोलापुरात आजपर्यंत एकूण 14 बाधित, यातील 13 जणांवर उपचार सुरू, एकाचा आधीच मृत्यू झालेला आहे
अकोल्यात आणखी एका 17 वर्षीय युवतीला कोरोनाची बाधा, पॉझिटिव्ह निघालेली युवती 13 एप्रिलला मरण पावलेल्या कोरोना रूग्णाची मुलगी, जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 15 वर, यातील 11 रूग्ण दुसऱ्या चाचणीत आढळले निगेटिव्ह
मुंबई : कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थिती एका सामान्य टॅक्सी चालकाचा हकनाक बळी, सुदर्शन रसाळ असे टॅक्सी चालकाचे नाव, अचानक उलट्या सुरू झालेल्या सुदर्शन रसाळ या टॅक्सी ड्रायव्हर वर मुंबईतील आठ हॉस्पिटलने उपचार करण्यासाठी दिला नकार, हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्ण असून नवीन पेशंटसाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत उपचार करण्यास दिला नकार, रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत मुंबईतील 8 हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांच्या केल्या विनवण्या
नंदुरबार : शहादा शहरात भाजीपाला मार्केटमध्ये मास्क न लावता फिरणाऱ्या तरुणींना हटकले असता नगरपालिका कर्मचाऱ्यांशी घातली हुज्जत, नातेवाईकांना बोलवून मुख्यधिकरी आणि कर्मचारी यांच्या सोबत अरेरावी, काल सायंकाळची घटना असल्याची माहिती, हुज्जत घालणाऱ्या तरुणींना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुंबईत 20 पासून वाहतूक व्यवस्था वाढवण्यासाठीच्या एसटी महामंडळाच्या हालचाली, मुंबईत काम करण्यासाठी सातारा जिल्ह्यातून 35 वाहक चालक मागवले
पालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही चोर आल्याच्या अफवांचे पेव कायम असून डहाणू तालुक्यातील पाच दिवसापासूनच्या दोन धक्कादायक घटनांनंतर रात्री पुन्हा डहाणू तालुक्यातील घोलवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाई दुबलपाडा येथे पायी जाणाऱ्या एका भिकाऱ्याला चोर समजून बेदम मारहाण केली. घोलवड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी रात्री 11 वाजता तात्काळ घटनास्थळी धाव घेत भिकाऱ्याला वाचविले. यावेळी जवळपास 40 जणांचा जमाव घटनास्थळी होता. अशी माहिती घोळवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सोनवणे यांनी दिली. पालघर जिल्ह्यात पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे आज दुपारी 2 वाजता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे संपर्क साधणार आहेत. डहाणू तालुक्यातील गडचिंचले येर्हे अफवा पसरवून तीन लोकांची व्यक्तीची हत्या करण्यात आली होती.
बेळगाव | लॉकडाऊनच्या बंदोबस्तासाठी दुचाकीवरून जात असताना कुत्रे रस्त्यात आडवे आल्याने दुचाकीवरून खाली पडून पीएसआयचा जागीच मृत्यू, येळ्ळूर रोडवरची घटना
वाडिया रुग्णालयाच्या परिचारिकेविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल, कोरोनासंदर्भात अफवा पसरविल्याचा परिचारिकेवर आरोप, वाडिया रुग्णालयानंच केली परिचारिकेची तक्रार,कोरोनाच्या काळात भक्कमपणे उभं न राहता कर्मचाऱ्यांमध्ये अफवा आणि भीती निर्माण केल्याचा आरोप, परिचारिकेनं रुग्णालयाविरोधात व्हायरल केला होता व्हिडीओ, दोन्ही बाजू समजून घेऊन पोलिस तातडीनं दाखल करणार गुन्हा
पुण्यात काल रात्रीत आणखी 15 पॉझिटिव्ह रुग्णांची भर, पुण्यातील कोरोना प्रादुर्भावाचा पालकमंत्री अजित पवार आज घेणार आढावा
औरंगाबाद कोरोनाचा तिसरा बळी. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 65 वर्षीय महिलेचा मृत्यू. गेल्या दोन दिवसांपासून महिलेची प्रकृती गंभीर, घाटी रूग्णालयाचे डीन कानन येळीकर यांची महिती
औरंगाबाद कोरोनाचा तिसरा बळी, घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 65 वर्षीय महिलेचा मृत्यू
मुंबईतील नौसेनेतील 21 जवानांना कोरोनाची लागण, मुंबई डॉकयार्डवर तैनात होते जवान, नौसेनेच्या आयएसएचएन अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु
0 comments:
Post a Comment
please do not enter any spam link in comment box.