Saturday, 18 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा कडकडीत बंद दोन दिवस सर्व व्यवहार बंद जनतेचे पुर्ण सहकार्य.

 शुभम भंसाली
अक्कलकुवा प्रतिनिधि
१८/०४/२०२०



देशात व राज्यात दिवसें दिवस कोरोना चे रुग्ण वाढत आहेत. त्याच सोबत नंदुरबार जिल्ह्यात काल एक कोरोनाचा पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याने संपूर्ण जिल्हा अधिक सतर्क झाला आहे. जिल्हाधिकारी यांनी संचार बंदी अधिक कठोर केली आहे. तसेच अक्कलकुवा तालुका हा गुजरात राज्या लगत असून सिमेवरील डेडियापाडा तालुक्यात तसेच सेलांबा येथे सुध्दा कोरोना चे रुग्ण आढळले असून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन जनता कर्फ्यू सारखा निर्णय अक्कलकुवा तसेच खापर ग्रामपंचायत ने सतर्कता दाखवत अक्कलकुवा शहर दोन दिवस तर खापर शहर तीन दिवस अत्यावश्यक दवाखाना व मेडिकल सेवा वगळता सर्वच दुकाने व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला संपूर्ण ग्रामस्थांनी व व्यापा-यांनी पूर्ण पणे प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.
      आज अक्कलकुवा व खापर शहर संपूर्ण पणे बंद होते. ठिक ठिकाणी पोलिस विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक गावात ग्राम सुरक्षकांना तैनात करण्यात आले आहे. अनोळखी व बाहेर गावातुन आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

mdtv

Author & Editor

0 comments:

Post a Comment

please do not enter any spam link in comment box.