Saturday, 18 April 2020

माणुसकीचा 'झरा' आटू न देणारा अवलिया!

दिनांक 15 शहादा शिवम मेडिकल चे संचालक विजय बाबुराव चव्हाण यांच्याकडून आजीवन मोकाट प्राण्यांच्या उपचारासाठी लागणारी औषधी सेवा मोफत देण्याचा संकल्प.


संकल्प ग्रुप ने जागोजागी प्राण्यांसाठी पाण्याच्या कुंड्या व अन्नदानाचे एटीएम लावले आहेत तसेच संकल्प ग्रुप मागील दोन वर्षापासून शहादा शहरातील  मोकाट मुक्या प्राण्यांच्या औषधी व त्यांच्या उपचार करत आहे. त्याच्याच प्रेरणेने शहादा येथील शिवम मेडिकल चे संचालक विजय चव्हाण रा. मंदाना ह. मुक्काम शहादा यांनी रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरे, प्राणी, पशु पक्षी यांच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधी,इंजेक्शन्स,सलाईन व इतर वस्तू ह्या आजीवन मोफत पुरवणार असल्याचे सांगितले व संकल्प ग्रुप यांना सर्व अत्यावश्यक असलेल्या औषधींचे किट पशुसंवर्धन विभाग असिस्टंट कमिशनर डॉ. सागर परदेशी, मंदाना येथील उपसरपंच अनिल भामरे, डॉ.भरत पाटील, केतन चकणे  यांच्या उपस्थितीत संकल्प ग्रुप च्या सदस्यांना औषधी किट प्रदान करण्यात आले.
विजय चव्हाण यांचे वडील बाबुराव सिताराम चव्हाण यांनी पशुसंवर्धन विभागात डेप्युटी कमिशनर म्हणून आपली सेवा बजावली आहे. त्यांच्याच वारसा घेऊन विजय चव्हाण हेसुद्धा त्या क्षेत्रात आपली सेवा मागील चोवीस वर्षापासून शहरासह संपूर्ण तालुक्यात देताहेत. वडिलांची इच्छा व प्रेरणेने आपण हे काम करत आहोत असे यावेळी विजयभाऊ चव्हाण यांनी सांगितले.
मुकेश पटेल.
पुरुषोत्तमनगर प्रतिनिधी.

mdtv

Author & Editor

0 comments:

Post a Comment

please do not enter any spam link in comment box.