संचारबंदी दरम्यान आज नंदुरबार पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरटी वाहतुक करणाऱ्या गुटख्याचा ट्रक पकडला आहे. या डंपरमध्ये प्रतिबंधीत गुटखा आणि पानमसाल्याच्या जवळपास साडे नऊ लाखांच्या मालासह जवळपास 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रात आधीच गुटखा प्रतिबंधीत असुन संचारबंदी असतांनाही अतिशय चोरट्या मार्गाने या साऱ्या गुटख्याची तस्करी केल्या जात होती. याची गोपणीय माहीती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्या नंतर शहराबाहरे जाणाऱ्या निझर रस्त्यावर हा ट्रक आडवण्यात आला. यानंतर हा ट्रक उपनगर पोलीस ठाण्यात आणुन सर्व माल सील करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ह्या ट्रक सोबत चार जणांना अटक देखील करण्यात आली असुन यातील बडे मासे गळाला लागण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे
Saturday, 18 April 2020
नंदूरबार पोलिसांची मोठी कारवाई 35 लाखांचा गुटखा जप्त.
mdtv
Author & Editor
April 18, 2020
News & Blog | MDTV News |India
Subscribe to:
Post Comments (Atom)



0 comments:
Post a Comment
please do not enter any spam link in comment box.