Saturday, 18 April 2020

नंदूरबार शहरात 17 ठिकाणी सील नंदूरबार करांची उडाली झोप.




नंदुरबार शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने झोप उडाली आहे, नगरपालिकेची आरोग्य यंत्रणाही खळबळून जागे झाली असून काल शुक्रवारी रात्री ९:३० ते १२:३० पर्यंत अली सहाब मोहल्ला, फकीर मोहल्ला, बालाजी वाडा, दखनी गल्ली,मणियार मोहल्ला, बिस्मिल्ला चौक, बिफ मार्केट रोड, रज्जाक पार्क,अमीन भैय्या चाळ, चिंचपाडा भिलाटी, मेहतर वस्ती, गोंधळी गल्ली, जुना बैल बाजार या सर्व ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशनची जंतुनाशक फवारणी करण्यात आली. कोरोना प्रार्दुभाव टाळण्यासाठी 17 ठिकाण सील करण्यात आले असून 14 ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. पहाटे 5 पर्यंत हे काम सुरू होते. दरम्यान ग्रीन झोन मध्ये असलेल्या नंदुरबारला देखील कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने साऱ्यांची झोप उडाली आहे, खबरदारीचा उपाय म्हणून नंदुरबार शहरात आजपासून तीन दिवस कर्फ्यु लावण्यात आला आहे,त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.

mdtv

Author & Editor

0 comments:

Post a Comment

please do not enter any spam link in comment box.