अक्कलकुवा येथील एक व्यतींना कोविड-19 चा संसर्ग
शुभम भंसाली
अक्कलकुवा प्रतिनिधि
२२/०४/२०२०
प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही तसेच बफर झोन जाहिर
अक्कलकुवा शहरातील 32 वर्षीय महिलेला कोविड-19 चा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने अक्कलकुवा शहर बफर झोन जाहीर करण्यात आले आहे. प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारीच्या उपाययोना सुरू करण्यात आल्या असून संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे.
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू आहे. साधारण 170 गावांना लागून वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. त्यामुळे कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी इतरांना स्पर्श न करणे, वारंवार साबणाने हात धुणे, बाहेरून आल्यावर कपडे स्वच्छ धुणे, दोन व्यक्तीत किमान सहा फुटाचे अंतर ठेवणे आदी उपययोजनांवर भर द्यावा. प्रशानाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
प्रतिबंधात्मक क्षेत्रातून बाहेर जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींची नोंद घेण्यात येईल. भौगोलीक विलगीकरण क्षेत्रात जाणाऱ्या व्यक्तींना औषधांचा डोस देण्यात येईल. या क्षेत्रातून बाहेर जाणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. अत्यावश्यक सेवेचा पुरवठा करताना सोशल डिस्टन्सिंग करणे आवश्यक राहील. आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
अक्कलकुवा शहरातील भाग क्र. 2 परिसर प्रतिबंधीत क्षेत्र
तहसिलदार अक्कलकुवा तथा इंन्सीडेंट कमांडर विजय कच्छवे यांनी भाग क्र. 2 मधील कोंडवाडा गल्ली (पुर्वेकडील भाग) दर्गा रोड (फेमस चौकाजवळील भाग), हवालदार फळी (दक्षिणेकडील भाग) प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.
उत्तरेकडील अनिस अहमंद फत्तेमहमंद यांच्या घरापासून उत्तरेकडील दर्गारोड परिसर, पश्चिमेकडील कोंडवाडा गल्लीतील पारस अशोकचंद सोलकी यांच्या घरापासून, दक्षिणेकडून फेमस चौक, पुर्वेकडील इंदिरानगर परिसर अशा प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या चतु:सिमा असतील.
या परिसराच्या उत्तरेकडील दर्गारोड परिसर, केशव नगर,बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यासोबत पश्चिमेडील कोंडवाडा गल्ली, दक्षिणेकडील फेमस चौक परिसर, कुंभार गल्ली आणि पुर्वेकडील इंदिरा नगर परिसर हे क्षेत्रदेखील बफर झोन म्हणून जाहीर केले आहे.
प्रतिबंधात्मक क्षेत्रात कोणालाही ये-जा करता येणार नाही. सर्व प्रकारच्या वाहनांना या क्षेत्रात प्रतिबंध असेल. अत्यावश्यक सेवा सुरळीत राहण्यास मुभा राहील. अशी सेवा पुरविणाऱ्यांची तपासणी करणे बंधनकारक राहील. अत्यावश्यक सेवेसाठी संबंधितांना सुरक्षा पास उपलब्ध करून देण्यात येतील. प्रतिबंधीत क्षेत्रात येण्याजाण्याच्या ठिकाणी उष्म चाचणी करणे आवश्यक राहील. आरोग्य सेवकांनी ये-जा करणाऱ्या सर्वांची छाननी करावी.
प्रतिबंधात्मक क्षेत्रातून बाहेर जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींची नोंद घेण्यात येईल. भौगोलीक विलगीकरण क्षेत्रात जाणाऱ्या व्यक्तींना औषधांचा डोस देण्यात येईल. या क्षेत्रातून बाहेर जाणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. अत्यावश्यक सेवेचा पुरवठा करताना सोशल डिस्टन्सिंग करणे आवश्यक राहील. आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासन सतर्क, परिसराचे निर्जंतुकीकरण
अक्कलकुवार शहरात तीनवेळा औषध फवारणी करण्यात आली आहे. परिसरातील प्रत्येक घरात वैद्यकीय सर्वेक्षण करण्यात येत आहे. संपूर्ण परिसरात बॅरेकेडींग करण्यात आले आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात वाहनांना पुर्णत: बंदी करण्यात आली आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर चार व्यक्तींना पूर्वीच क्वॉरंटाईन करण्यात आले होते. याशिवाय प्राथमिक संपर्कातील 19 व्यक्तींचे स्वॉब घेण्यात येत आहेत. तर दोन व्यक्तींना अक्कलकुवा येथे क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
सदर अक्कलकुवा येथे प्रतिबंधित क्षेत्र केल्यानंतर तेथे प्रांत अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी अविनाश पंडा यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकारी व् कर्मचाऱ्यांना विविध सुचना केल्या. यावेळी प्रभारी तहसीलदार विजय कच्छवे, उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, गट विकास अधिकारी सी.के.माळी, पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे आदि उपस्थित होते
संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती
प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांना अत्यावश्यक वस्तू अथवा सेवा घरपोच देण्यात येणार असून त्यासाठी संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या क्षेत्रातील नागरिकांनी उप अभियंता एस.आर.पवार (9404565693), सहा. अभियंता के.एम.राठोड (9884502984) किंवा तलाठी जी.डी.साखरे (9028905103) यांच्याशी संपर्क साधावा





0 comments:
Post a Comment
please do not enter any spam link in comment box.