शुभम भंसाली
अक्कलकुवा प्रतिनिधि
२३/०४/२०२०
खापर येथील पोलिस दुरक्षेत्रातील कर्मचारी, सर्व होमगार्ड, विलगीकरण कक्षातील आरोग्य कर्मचारी आणि तेथे नियुक्त करण्यात आलेले विविध विभागाचे शासकीय कर्मचारी व ग्रामरक्षक दलातील युवकांना खापर चे माजी उपसरपंच ललीत जाट यांच्या कडून प्रत्येकी 2 सेनेटाइजर,2 मास्क आणि 2 हैंडग्लोब्ज चे वाटप करण्यात आले. Covid-19 वायरस विरोधाच्या लढ्यात या सर्व घटकांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यांच्या या योगदानाची ललीत जाट यांनी दखल घेत हा साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतला. यावेळी ग्रामरक्षकांना ओळखपत्रचे देखील वाटप करण्यात आले असून ललीत जाट यांनी त्यांना ओळखपत्राचे कोणीही दुरूपयोग न करता वेळोवेळी वाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून ज्या सुचना दिल्या जातील त्याचे पालन आणि अमलबजावणी करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी माजी उपसरपंच लक्ष्मण वाडिले, ग्रा.पं सदस्य जगदीश चित्रकथी,नमिनाथ पतसंस्थेचे चेयरमैन पवन जैन, अक्षय सोनार, किसन वसावे, पत्रकार संघाचे पदाधिकारी, पोलिस कर्मचारी, होमगार्ड, आरोग्य कर्मचारी आदि उपस्थित होते. सोशल डिस्टेंसिंग चे देखील पालन करीत एकमेकापासून सर्व जण अंतर ठेवत सर्वांनी साहित्त्य घेतले. आणि त्यांच्या कार्याची कुणीतरी दखल घेतल्याचे समाधान सर्वांनी व्यक्त केले.

0 comments:
Post a Comment
please do not enter any spam link in comment box.