Thursday, 23 April 2020

अक्कलकुवा ग्रामपंचायती कडून शहरात जंतुनाशक फवारणी शुरू...

शुभम भंसाली
अक्कलकुवा प्रतिनिधि
२३/०४/२०२०

अक्कलकुवा शहरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने ग्रामपंचायत तर्फे विविध उपाय योजना शुरू

अक्कलकुवा शहरात कोरोना च्या रुग्ण आढळल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे, खबरदारीचा उपाय म्हणून अक्कलकुवा ग्रामपंचायत कडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. तसेच वार्ड क्र 2 मध्ये रुग्ण आढळला असून त्या ठिकाणी विशेष जंतुनाशक फवारनी करण्यात येत आहे.
यावेळी सरपंच राजेश्वरी वळवी, उपसरपंच मुन्ना मक्रानी, माजी उपसरपंच विश्वास मराठे
 ग्रा.प.सदस्य कादर बलोच, उमेश पाडवी, रूपसिंग वळवी, बापू महिरे, जयेश चौधरी, भिकमचंद चव्हाण, ग्रामविकास अधिकारी प्रवीण तावड़े, सह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


अक्कलकुवा शहरात कोरोना च्या एक रुग्ण मिळाला आहे. तरी सर्व नागरिकांनी आता सतर्क व्हायच असून नागरिकांनी अनावश्यक बाहेर निघु नये तसेच प्रशासनाने दिलेल्या सुचना च्या पालन करावा पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे तसेच ग्रामपंचायत मार्फत संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारनी करण्यात येत आहे. व शहरात ग्रामरक्षक दल सुधा तैनात करण्यात आले आहे. 
राजेश्वरी वळवी (सरपंच अक्कलकुवा)

अक्कलकुवा शहरात कोरोना च्या रुग्ण आढल्याने ग्रामपंचायत तर्फे खबरदारी म्हणून विविध उपायोजना करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामा शिवाय बाहेर येऊ नये विशेष करून पालकांनी आपल्या मुलांना घरा बाहेर निघु देऊ नये तसेच गल्लीत एकत्र येऊ नए अश्या सुचना देण्यात आल्या आहे.
मुन्ना मक्रानी (उपसरपंच)

अक्कलकुवा शहरात ग्रामपंचायती कडून जंतुनाशक फवारनी होत. असून फवारनीच्या वेळी ग्रामस्थांनी आपले घरांचे व दुकानाचे दरवाजे बंद करावे. तसेच प्रशासनाने दिलेल्या सुचनांचा सर्वानी पालन करावे.-
विश्वास मराठे (माजी उपसरपंच)

अक्कलकुवा शहरातील प्रत्येक वर्डात जंतुनाशक फवारनी करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक वर्डात जाऊन नागरिकांना घरात राहण्याचे सूचना देखील करण्यात आले आहे-
प्रवीण तावड़े (ग्रामविकास अधिकारी)

mdtv

Author & Editor

0 comments:

Post a Comment

please do not enter any spam link in comment box.