कोळदा ते सेंधवा या दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. हेच काम प्रकाशा ते ...प्रकाशा : कोळदा ते सेंधवा या दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. हेच काम प्रकाशा ते तळोदा चौफुलीजवळ अपूर्णावस्थेत असल्याने गेल्या सहा महिन्यापासून वाहनधारकाना अडचणीचे ठरू पाहात आहे. सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे याठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या खड्ड्यामुळे अवजड वाहनाचा मागील भाग टेकला जात असल्याने वाहन नादुरूस्त होत आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
याबाबत असे की, कोळदा ते सेंधवा या दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र कोरीट चौफुली ते तळोदा चौफुलीपर्यंतचा मार्ग खडतर झाला असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान, तळोदा चौफुलीवरी पेट्रोल पंपाजवळ संबंधित ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवला असून, या खोदलेल्या रस्त्यावर दगड गोटे टाकून ठेवले आहेत. मात्र ज्या ठिकाणी दगड व मुरूम टाकले आहे त्यावर जेसीबी अथवा रोटलदेखील फिरविण्यात आला नसल्याने वाहनधारक पर्यायी मार्गावरून जात आहेत. परंतु या पर्यायी रस्त्यावरच खड्डा तयार झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे. मध्यंतरी पावसाळा सुरू झाल्याने हा खड्डा अधिक पसरल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.या मार्गावरून वाहन काढताना मागील भाग खड्ड्यास टेकला जात असल्याने वाहनाचे नुकसान होत असून, या खड्ड्यात वाहन फसत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून या मार्गावरील अपूर्णावस्थेत असलेले काम त्वरित पूर्ण करून वाहनधारकांना सोयीचे करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.या ठिकाणी पोलिसांतर्फे बॅरिकेट्सदेखील लावण्यात आले आहे. याठिकाणी वेळोवेळी होणाºया ट्रॅफिक जाममुळे पोलीस कर्मचारीही वैतागले असून, संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.या समस्येबाबत संबंधित ठेकेदाराला वारंवार सांगूनही दुर्लक्ष करीत असल्याने गेल्या सहा महिन्यापासून वाहनधारक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व जिल्हाधिकाºयांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देवून या मार्गावरील अपूर्णावस्थेत असलेले काम त्वरित मार्गी लावावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 comments:
Post a Comment
please do not enter any spam link in comment box.