चित्रपट फाट्याजवळ घटना
पिंपळनेर- पिंपळनेर मार्गे मनमाडकडे जात असताना इथेनॉल भरलेला टँकर दहिवेल पिंपळनेर चिचपाडा फाटा येथे पलटी झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. सदर घटना सकाळी आठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली. सायंकाळी पाच वाजेनंतर सदर टँकर उभे करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाहतुकीचा मार्ग सुरळीत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पीएसआय भूषण हंडोरे प्रयत्न करीत आहेत. पंचायत समिती सदस्या संगीता गणेश गावित यांनी घटनेची पाहणी करत वरिष्ठांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.....

0 comments:
Post a Comment
please do not enter any spam link in comment box.