Thursday, 23 April 2020

नंदुरबार पाठबंधारे विभागाकडून शेतकऱ्यावर होतोय अन्याय

                           नंदुरबार पाठबंधारे विभागाकडून शेतकऱ्यावर  होतोय अन्याय...
दि:22,शनिंमांडळ


नंदुरबार पाटबंधारे विभाग अंतर्गत ठाणेपाडा येथील तांबारा धरणात पर्याप्त पाणीसाठा असताना आखतवाडे शिवारातील पिकांसाठी दोन आवर्तन पाणी देणे खूप गरजेचे आहे. परंतु नंदुरबार पाटबंधारे विभागातील कर्मचारी धरणातून पाणी सोडण्यास नकार देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.
                                          पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांची मनमानी....


धरणात सध्या  पाणी सोडणारे गेटवर दहा फूट पाणी  असून सुद्धा  कर्मचारी पाणी नसल्याचा आव आणत आहेत. सध्याच्या जागतिक महामारी करुणा सदृश्य परिस्थिती असताना शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी देण्याकरिता शेतात जावे लागते मात्र धरणातून पाणी सोडण्यास वरून शेतकऱ्यांमध्ये एकमेकात वाद निर्माण होतात त्यात शेतकरी एकत्र आल्यामुळे कोरोना आजार पसरण्याची भीती वाढली आहे. पाटबंधारे विभागातील किमान एका कर्मचाऱ्याने पाणी सोडण्यासाठी उपस्थित राहावे मात्र हे कर्मचारी घरी राहून फोनवरून मनमानी करताना दिसत आहेत.
धरणातुन अवैद्य मासेमारी...... 


मासेमारीचा कोणताही परवाना नसताना किंवा परवानगी नसताना माशांचे बीज धरणात सोडण्यात आले होते. यासंदर्भात शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती नाही. मात्र सध्या माशांचे कारण देऊन शेतकऱ्यांच्या पिकासाठी पाणी बंद करण्यात आले. यामुळे पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचार केल्याचा संशय निर्माण होत आहे. मासेमारी करणारे धरणातून पाणी सोडणाऱ्या गेटचे वारंवार नुकसान करून बंद करत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी वारंवार निवेदने दिलीत.....
जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभाग नंदुरबार येथील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना पाणी मिळावे, म्हणून निवेदन देण्यात आले होते. अवैद्य मासेमारी करणार्‍यांपासून पोलीस संरक्षणाची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. प्रशासनाने तात्पुरता दखल घेऊन उपाययोजना केली मात्र हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला.
पिकासाठी शेवटचे दोन आवर्तन पाणी गरजेचे....
पाटबंधारे ने शेतकऱ्यांकडून सध्याच्या पिकांची रक्कम देऊन पावती केली होती. आत्तापर्यंत पिकाला पाणी मिळत होते. मात्र आता ताण पडल्यामुळे पिके करपू लागली आहेत. पाठबंधारा कर्मचाऱ्यांनी हात वर केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

       पाटबंधारे उपविभाग नंदुरबार व जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घ्यावी. पिकासाठी किमान दोन आवर्तने पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी करत आहेत....

mdtv

Author & Editor

0 comments:

Post a Comment

please do not enter any spam link in comment box.